मुल (तालुका प्रतिनिधी. ) स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ मूल शहरांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दाढी वाढवल्याने प्रंतप्रधान बनत नाही त्याला बुद्धी लागते अशी टीका राहुल गांधी यांच्यावर केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी केलेल्या त्यागाचा आदर न करता काँग्रेस यांचे सह देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशाच्या सर्व धर्मीय महामानवांचा अपमान करणे हा काँग्रेस चे धोरण ठरले असून,अशा देश विरोधी काँग्रेसच्या विसर्जनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आता कामाला लागा असे आवाहन ना. सुधिर मुनगंटीवार मंत्री वन ,सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय यांनी जीवन गौरव यात्रा समारोप प्रसंगी व्यक्त केले. भाजपा पदाधिकारी यांनी स्वागत यात्रा समितीतर्फ नाम. सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
जिल्हाध्यक्ष भाजपा देवरावजी भोंगळे, जि.प.माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले ,माजी नगराध्यक्ष बल्लारपूर हरीशजी शर्मा, न. प.माजी अध्यक्ष रत्नमाला भोयर, भाजप शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, न.प. माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मूल पं.स. माजी सभापती चंदू मारर्गवार न.प.माजी सभापती प्रशांत समर्थ माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टणकर, माजी नगरसेवक प्रशांत लाडवे, माजी नगरसेवक महेंद्र करकाडे ,राकेश ठाकरे ,सुनील आयलनवार ,बंडू निर्मलवार ,गुरु भेंडारे ,संजय येनुरकर यांचे सह भाजप कार्यकर्ते व महिला कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन न.प. माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी केले तर आभार शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी केले