मागील एक आठवड्यात मुल शहर व परिसरात पावसाने थैमान घातले असून ,शहरातील व तालुक्यातील शेकडो घरांमध्ये पाणी घुसले होते, नामदार मुनगंटीवार यांनी त्याच दिवशी पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते व त्याच दिवशी प्रशासनाने पंचनामे करीत नुकसान भरपाई साठी यादी तयार असल्याची माहिती आहे, एक दिवसात 237 मिमी इतका पाऊस झाल्याने जनता व प्रशासनाची तारांबळ उडाली होती, उद्या पालकमंत्री स्वतः तहसील कार्यालयात उपस्थित राहून संपूर्ण पूरपरिस्थिती चा आढावा घेणार आहेत,