मागील काही दिवसांपासून मुल वासीयांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रस्तावित सुरजागड लोहखनिज साठी रेल्वे मालधक्का प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार आज मुल शहरात संबंधित सर्व अधिकारी आज शहरात दाखल झाले,अधिकाऱ्यांच्या चमुमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,सहाय्यक विभागीय रेल्वे प्रबंधक , वन संरक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज सर्व अधिकारी दाखल होऊन मालधक्का विषयावर चर्चा झाली, मुल रहिवासी आराखडा तसेच प्रस्तावित मालधक्क्यासाठी पर्यायी जागा हा एकमेव विषय घेत आज अधिकाऱ्यांचा दौरा होता, यात मुल शहर संघर्ष समिती, मॉर्निंग ग्रुप, युवा संघटना यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत विषयाचे गांभीर्य पटवून देत, पुन्हा संबंधित निवेदन दिले,अधिकाऱयांनी मुल रेल्वे स्थानकावर पण भेट देत पाहणी केली