भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी कंपनीकडे दिवसेंदिवस ग्राहकांचा कल वाढत आहे, शेतकरी, पतंजली अश्या अनेक किफायती दरातील प्लॅन नंतर आता बीएसएनएल ने पोलीस बांधवांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन आणला आहे, सदर प्लॅन मध्ये 169 रु रिचार्ज मध्ये प्रत्येक दिवसाला 2 GB डेटा तर बोलायला महिनाभर अनलिमिटेड असणार आहे, सदर रिचार्ज ची वॅलिडीटी 30 दिवस राहणार आहे , सदर प्लॅन हा पोलीस बांधवांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा घेता येणार आहे , नवीन 4G सेवा सुरू होत असल्याने ग्राहकांमध्ये नवीन उत्साह बघायला मिळत आहे, अधिक माहितीसाठी तसेच सिमकार्ड घेण्यासाठी नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क करण्याचे आवाहन गडचिरोली बीएसएनएल चे उपविभागीय अभियंता(विपणन) किशोर कापगते (9422154999) यांनी केले आहे