Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedप्रवीण मराठे यांचा आकस्मिक मृत्यू

प्रवीण मराठे यांचा आकस्मिक मृत्यू

जो आवडी सर्वांना तोचि आवडे देवाला अशी एक म्हण प्रचलित आहे , या म्हणीला मिळती जुळती घटना आज सकालीच मुल शहरात घडली, मुल शहरातील एक सदैव हसत राहणारे, शून्यातून विश्व कशे निर्माण करायचे याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवणारे, फर्मासिटीकल क्षेत्रात आपला असीम ठसा उमटवणारे, व्यायामाला सदैव महत्व देणारे, उत्कृष्ट जलतरण पटू प्रवीण दादा मराठे आज सकाळी नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉक ला गेले, कर्मवीर महाविद्यालया समोरील शिव टेकडी जवळ आपली कार पार्क केल्यानंतर त्यांनी चंद्रपूर रोड कडे आपला वॉक सुरू केला, रान तलावसमोर मुल शहरातील काही युवकांना एक युवक पडलेल्या अवस्थेत दिसला, प्रवीण मराठे हे प्रचलित व्यक्तिमत्व होते त्यामुळे त्या युवकांनी सहज ओळखले,ते युवक आले तेव्हा प्रवीण जिवंत होते पण काही मदत करण्या पूर्वी त्यांनी प्राण सोडले, प्रवीण यांच्या आकस्मिक मृत्यमुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या असून कुणीही प्रत्यक्ष दर्शी नसल्याने त्यांच्या मृत्यू चे गूढ न उलगणारे राहील, हार्ट अटॅक मूळे मृत्यू झाला असेल असा प्राथमिक अंदाज आहे, पण जोरात चालल्याने, की वाघाचा वावर असलेला परिसर असल्याने वाघ दिसून घाबरून हार्ट अटॅक आला की कुठल्या वाहनाने कट वगैरे बसल्याने अटॅक अशे अनेक चर्चाणा उधाण आले आहे, काहीही असेल तरी कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते एक उमद्या व्यक्तिमत्वाला कायमचे मुकले आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments