आज दि.30जून 2023 रोज शुक्रवारला बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्यात आला…
सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य श्री.विनोद सरांच्या हस्ते सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी तथा पालक या सर्वांसमवेत दीपप्रज्वलन करण्यात आले त्या नंतर सर्व
विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्पुच्छ ,वही व पेन देऊन स्वागत करण्यात आले त्या नंतर शाळेचे क्रीडा शिक्षक श्री स्वप्नील नवगडे सर यांनी विविध प्रकारचे खेळ घेऊन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकावला. अतिशय आनंदमय शिस्तबद्ध वातावरणात हा शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला…
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन कु तोषी जयस्वाल मॅडम यांनी केले .व आभार प्रदर्शन कु.दुर्गा कोटगले मॅडमनी मानले….
सदर कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य , शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते….