मूल दिनांक 13 जुलै 2023 रोज गुरुवार ला बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथील शाळेच्या परिसरात वृक्षरोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड बाबासाहेब वासाडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, मूल तसेच कार्यक्रमाचे मुख्यअतिथी म्हणून ऍड अनिल वैरागडे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ, मूल तथा कार्यक्रमाचे विशेषअतिथी म्हणून श्री गजेंन्द्र वरगटीवार राउंड ऑफिसर वनविभाग मूल व श्री परचाके सर यांनी अतिथीय स्थान भूषवले. शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार यांनी मान्यवाराचे रोप देऊन स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच विद्यार्थी, पालक, व शिक्षकांना पर्यवारणाचे महत्व आपल्या प्रास्ताविक भाषणातून पठवून दिले. तसेच मान्यवारांनी पर्यवारणाचे महत्व पटवून देताना सर्वांनी किमान एक तरी रोप आपल्या घरी लावावे आणि सांभाळ करावे असे विद्यार्थना आवाहन केले.आणि सर्व मान्यवारांनी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचा हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तोषी जयस्वाल यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु दुर्गा कोटगले हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.