महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला . यामध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथील दहावीचा एकूण निकाल 100.00टक्के लागला आहे.
त्यामध्ये कु.आदित्य केदारनाथ सोनुले 90.60% गुण घेऊन विद्यालयामधून प्रथम क्रमांक पटकविले तर कु.पुरब अतुल पिल्लारवार याने 85.00% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकविले तसेच 82.00 टक्के गुण घेऊन कुमारी भीमाई संगत भडके हिने विद्यालयातून तृतीय क्रमांकांची मानकरी ठरली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ मूल च्या संस्थेचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे तसेच संस्थेचे सचिव ऍड.अनिल वैरागडे व विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्यसाठी शुभेच्छा दिले