बळीराजाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
6.90 लाख शेतकरी
एक क्लिक आणि…
2500 कोटी रुपये जमा!
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केला.
2.5 वर्षापूर्वी जी फक्त घोषणा झाली, ती आपण आज पूर्ण केली आहे.
आज तो ऐतिहासिक क्षण आहे.
सातत्याने दोन अर्थसंकल्पात याच्या फक्त घोषणा होत होत्या.
हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे. या दीड महिन्यात 7000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. सिंचन हा सरकारच्या प्राधान्यक्रमाचा विषय आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत.
सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि राहील.
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, अब्दुल सत्तार, दादाजी भुसे, शंभुराजे देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत आणि इतरही मंत्री, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.