मुल शहरातील प्रमुख मार्गावर दुभाजका सहित रस्त्याचे बांधकाम करण्यात आले, जुन्या बस स्थानकाचा विचार करता त्या नुसार दुभाजकामध्ये बस क्रॉसिंग साठी गॅप ठेवण्यात आली, नंतर मात्र नवीन बस स्थानकाचे बांधकाम झाल्याने बस येण्या जाण्यासाठी दुसऱ्या जागेवरून द्वार तयार झाले, नवीन द्वारासमोर दुभाजकामध्ये गॅप नसल्याने बस चे आगमन व निर्गमन एकाच जागेवरून होऊ लागले, त्यामुळे बस बाहेर काढताना खूप त्रास होऊ लागला कारण ज्या जागेवरून बस बाहेर निघत होती तिथे व्यापारी प्रतिष्ठान असून तिथे येणाऱ्या नागरिकांचे वाहन मोठ्या प्रमाणावर पार्किंग राहत असत, सदर समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी नवीन बस्थानकाच्या गेट समोरील दुभाजक तोडून खुला करण्याच्या सूचना दिल्या, आता सदर दुभाजक तोडले असून लवकरच त्या जागेवरून ट्राफिक सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे वारंवार होणाऱ्या ट्राफिक जाम ची समस्या दूर होणार असून नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे