Saturday, January 25, 2025
HomeUncategorizedबहुचर्चित मुल मालधक्क्याच्चें काम सुरू करण्याचे कंत्राटदाराचे प्रयत्न हाणून पाडले

बहुचर्चित मुल मालधक्क्याच्चें काम सुरू करण्याचे कंत्राटदाराचे प्रयत्न हाणून पाडले

मागील काही दिवसांपासून मुल शहरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का हा हॉट विषय आहे, सध्यातरी शहरात सरविकडॆ, सोसल मीडियावर एकच चर्चा आहे, यात मालधक्का होऊ नये म्हणून विविध संघटनेणकडून, राजकीय पक्षांकडून समर्थन करत मोर्चे काढले, मुकमोर्चा , निवेदन या माध्यमातून जनतेचे लक्ष वेधले, मतदारसंघाचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचे पण लक्ष वेधले, सुधीरभाऊंनी नागपूर येथे रेल्वे विभाग, वनविभाग, जिल्हाधिकारी, भाजप पदाधिकारी, मालधक्क्यास विरोध करणारे नागरिक-विविध संघटना यांची सयूंक्त बैठक बोलवत मालधक्का मुल येथे होणार नाही , कुठे करता येईल याची चाचपणी कराअश्या सुचना दिल्या,
यानंतर या मालधक्क्याच्या कामाचे कंत्राट मिळालेलं कंत्राटदार जागे होत विविध हातकांडे वापरून काम कस सुरू करता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले , या संबंधित शहरातील च काही लोक मालधक्क्याच्या समर्थनार्थ चंद्रपूर ला जात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या सुद्धा सोशल मीडियावर चालल्या, आज मात्र अचानक रेल्वे स्टेशन परिसरात एक जे सि बी द्वारे काम सुरू झाले असल्याचे मॉर्निंग ग्रुप व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना लक्षात येताच सर्वांनी एकत्रित येत रेल्वे स्थानक गाठले, प्रकरणाची माहिती लगेच दूरध्वनी वरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , जिल्हाधिकारी यांना देण्यात आली, काम करण्यास अटकाव करत विरोध करण्याचा प्रयत्न झाला, इकडून तिकडून आदेश येताच कंत्रादाराने काम बंद केल असलं तरी रात्री वैऱ्याची असल्याची भावना निर्माण झाली आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments