नवरगाव:
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि नवरगावच्या भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष परमानंद पाटील बोरकर यांचे नागपूरच्या किम्स इस्पितळात दिनांक 06/10/22 ला दुपारी दीड वाजता दुःखद निधन झाले. शुक्रवारी दिनांक 07/10/22 ला सकाळी10 वाजता नवरगाव येथील मोक्षभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. थोर समाजसेवी स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांचे ते धाकटे चिरंजीव तसेच नवरगाव सारख्या संवेदनशील गावात प्रदीर्घ काळ सरपंच राहिलेल्या रामराम पाटील बोरकर यांचे धाकटे बंधू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या परमानंद पाटील यांचा सरकार विरोधात तत्कालीन कच्छ च्या आंदोलनात मोठा सहभाग होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीत त्यांनी राजकीय कैदी म्हणून अठरा महिने तुरुंगवास भोगला. बरेच वर्ष ते सिंदेवाही तालुका भाजपाचे अध्यक्ष होते. श्री ज्ञानेश महाविद्यालयातून ते ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले. नवरगावच्या श्री व्यंकटेश नाट्य मंडळाचे ते गत पन्नास वर्षांपासून व्यवस्थापक होते. स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठाण चे ते सचिव होते. भारतीय शिक्षण संस्थेची सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे धुरा सांभाळली. शुक्रवारी रात्री झोपेतच मेंदूच्या जबरदस्त स्ट्रोक मुळे त्यांना नागपूरस्थित सिम्स इस्पितळात भरती करण्यात आले. मात्र अखेरपर्यंत त्यातून ते सावरले नाहीत. मृत्यूसमयी ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुनंदा बोरकर,मुलगा सदानंद बोरकर मुलगी श्रीमती माया मनोहर आनंदे आणि सौ उमा रवींद्र मस्के तसेच सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांना नवरगाव येथील स्मशान भूमीत मुखाग्नी देण्यात आली, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांनी प्रत्यक्षात भेट घेत त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले, ब्रम्हपुरी क्षेत्राचे माजी आमदार यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली, सर्वश्री मनोहर आनंदे, प्राचार्य बाकरे, राजू पाटील बोरकर, रमाकांत लोधे, माजी न्यायमूर्ती ज्ञानदेव परशुरामकर, डॉ तेजराम बुद्धे, चहांदे, आदींनी शोकसवेंदना व्यक्त केल्या, अंत्ययात्रेत गावकरी, कार्यकर्ते, नातेवाईक हजारो च्या संख्येने सहभागी झाले होते.
*भाजपा जेष्ठ कार्यकर्ते परमानंद पाटील बोरकर अनंतात विलीन.*
RELATED ARTICLES