Saturday, January 25, 2025
Homeमूलभुज(ब्रम्हपुरी) परिसरात आता हत्तीचे आगमन

भुज(ब्रम्हपुरी) परिसरात आता हत्तीचे आगमन

मागील काही वर्षांपासून छत्तीसगढ परिसरातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या परीसरात हत्तीची टोळी येत असते, काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ही टोळी वापस जाते, मागील वर्षी हे हत्ती गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसर व त्याच्याही समोर पर्यंत वास्तव्यास होते, या वर्षी सुध्दा हत्तीची टोळी गडचिरोली जिल्ह्यात आली पण त्यातील एक हत्ती मात्र त्या टोळी पासून भटकत गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात भ्रमंती करीत आहे, सावली तालुक्यातील व्याहाड परिसरात मुक्कामी राहिल्यानंतर या हत्तीने आपला मोर्चा आता लगतच्या ब्रम्हपुरी तालुक्याकडे वळविला आहे, भुज येथील शेतकऱ्यांना हत्तीचे दर्शन झाले असून , शेतीतील फिरण्याने मात्र शेतीची नुकसान होत आहे,
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments