Thursday, February 22, 2024
Homeमूलमंगेश पोटवार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेतकÚयांनी घेतली नामदार मुनगंटीवार यांची भेट

मंगेश पोटवार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेतकÚयांनी घेतली नामदार मुनगंटीवार यांची भेट

मूल (प्रतिनिधी): गेल्या काही महिण्यापासुन मूल तालुक्यात वन्यप्राण्यांनी अनेक शेतकÚयांचे जिव जात आहे मात्र प्रशासनाला अजुनही जाग येत नसल्याने मूल तालुक्यातील काही शेतकÚयांनी क्षेत्राचे आमदार व राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट देवुन विविध समस्यांचे निवेदन सुपुर्द केले, यावेळी नामदार मुनगंटीवार आणि शेतकÚयांमध्ये सकारातमक चर्चा झाली.
यावेळी झालेल्या चर्चेत मागेल त्या शेतकÚयाला शासनामार्फत 100 टक्के अनुदानावर सौर कंुपन देण्यात यावे. आणि तालुका स्तरावर सौर कुंपन मशीनचे दुरूस्ती केंद्र उभारण्यात यावे, वन्यप्राण्याच्या हल्लातील बाधीत गावाना प्राधान्य देवुन जंगलासभोवताल सौर कुंपन उभारण्यात यावे. जंगलाजवळील शेतशिवार असलेल्या शेतकÚयांना उच्च प्रतिच्या चार्जिंग बॅटरी उपलब्ध करून देण्यात यावे. सेंद्रीय शेतीला चालणा देण्यासाठी तालुका स्तरावर सेंद्रीय खत प्रकल्प उभारण्यात यावे. टाटा ट्रस्ट प्रकल्पातुन वगळयात आलेल्या गावांचाही समावेश करण्यात यावे. भाजीपाला उत्पादकांसाठी मूल शहरात भाजीपाला मार्केटची निर्मीती करण्यात यावे, राज्यपुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राची निर्मीती करून तज्ञ शास्त्रज्ञांची नियुक्ती करावी व आधुनिक शेतीला चालणा देण्यात यावे. सेंद्रिय शेती करणाÚया शेतकÚयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात यावे. टाटा ट्रस्टची व्याप्ती वाढवुन संरक्षीत शेतीला चालणा देण्यासाठी शेडनेट, पॉली हाऊस शेतकÚयांना 90 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे.
मानव-वन्यप्राण्याचे होणारे हल्ले टाळण्यासाठी तालुकास्तरावर स्थानिक नागरीकांची उपाय योजना समिती गठीत करण्यात यावे. आणि स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या निकषात बदल करून शेतकÚयासोबतच शेतमजुरांचाही समावेश करण्यात यावा यासंबधाने नामदार मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करण्यात आली, यासमस्या आपण सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
शेतकÚयांच्या शिष्टमंडळात भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार, प्रशांत मेश्राम, प्रभाकर सोनुले, गिरीधर वाघाडे, मनोज चावर,े उमाजी पाटील चुधरी, दामोधर सोनुले, विजय कन्नाके उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments