Thursday, February 29, 2024
Homeमूलमंत्रालय व विधिमंडळ संघाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने अविनाश भांडेकर सन्मानित.

मंत्रालय व विधिमंडळ संघाच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने अविनाश भांडेकर सन्मानित.

गडचिरोली :- मंत्रालय व विधिमंडळ संघाच्या वतीने दिल्या जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांना राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ मे रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात प्रदान करण्यात आला.
अविनाश भांडेकर यांनी आपल्या 32 वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून गडचिरोली पासून तर मुंबईपर्यंत बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. सामाजिक पत्रकारिते सोबतच विकास व शोध पत्रकारितेत त्यांनी नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासी जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली. अविनाश भांडेकर यांच्या पत्रकारितेतील या कार्याची दखल घेऊन मंत्रालय व विधिमंडळ संघाने त्यांची सन 2022 -23 च्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली होती. राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली सारख्या क्षेत्रातील पत्रकाराचा मुंबई येथे झालेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून अनेक वेळा पत्रकार आपला जीव धोक्यात घालून पत्रकारिता करतात. आजच्या माहिती तंत्रज्ञानाचे युगात काळानुरूप पत्रकारितेचे स्वरूप बदलून इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडिया आला असला तरी आजही प्रिंट मीडियाचे महत्व कमी झालेले नाही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही तर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे दुधारी शस्त्र असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांनी वस्तूनिष्ठ बातम्या व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य समाजापर्यंत पोचविल्या पाहिजे असे सांगून पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या. मुख्यमंत्र्यांनी याच कार्यक्रमात पत्रकार सन्मान योजनेचा निधी १०,००० रुपयावरून २०,००० रुपये अर्ध्या मिनिटात करून भावनाशील मुख्यमंत्री असेल तर कामाला गती येते हे दाखवून दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उद्योग मंत्री ना. उदय सामंत, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,बंदरे व खाणीकर्म मंत्री दादा भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे माहिती विभागाचे प्रभारी महासंचालक, मंत्रालय व विधिमंडळ संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे कार्यवाहक प्रवीण पुरो ,मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक , वैशाली भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments