Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedमराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन, मराठी विषय शिक्षक महासंघाने...

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन, मराठी विषय शिक्षक महासंघाने उचलले पाऊल*

वडसा देसाईगंज दि. 20 ऑक्टो…

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, नागपूर विभाग द्वारा सात दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण पार पडले .
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी तसेच मराठी भाषेच्या भाषा अध्यापनातील समस्या दूर करण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील शंभर शिक्षकांना प्रशिक्षण दिले गेले.
सविस्तर वृत्त असे की, दि.१० ऑक्टोबर २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत हे प्रशिक्षण ऑनलाइन दिले गेले, याचा समारोप दिनांक १८ ऑक्टों.२०२२ ला करण्यात आला.
या प्रशिक्षणाचे संयोजक,श्री. संजय लेनगुरे, जिल्हा प्रतिनिधी- भंडारा यांनी केले होते. मराठी भाषा व्यावहारिक पातळीवर समृद्ध आणि रोजगारभिमुख करता येईल का ? यावर सात दिवस विचारमंथन झाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपले विचार मोजक्या व प्रभावी शब्दात व परिणामकारक करण्यासाठी विद्यार्थी व अभ्यासू मन प्रभावी करावे लागते. ही जबाबदारी भाषा शिक्षकाची आहे, नव्या तंत्रज्ञानाचा आणि तंत्राचा वापर करून मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून प्रगल्भ करता येईल.भाषा शिक्षक विद्यार्थ्याना कलाजीवनासोबत भाषिक कौशल्ये प्रदान करू शकतो. विद्यार्थ्याच्या जीवनात जगण्याचे नवे सूत्र व्यावहारिक मराठीतून देऊ शकतो. भाषा जगण्याची संस्कृती प्रदान करते. ती जगण्यात प्रवाहीपण निर्माण करते. मग ती व्यवहारात रोजगार देण्यासाठी मागे असू शकत नाही. रोजगार हा कौशल्यातून प्राप्त करता येतो. तेव्हा भाषिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाची तेवढी गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यानंमध्ये स्वावलंबन मूल्य रुजविण्यासाठी, विद्यार्थ्याचे उद्याचे भविष्य उजळण्यासाठी व्यावहारिक मराठी आणि उपयोजन समृध्द करू शकेल. असा या प्रशिक्षणातून सुर उमटला.
भाषा विषयाच्या वेगवेगळ्या भाषा तज्ज्ञांनी आपला विषय सविस्तरपणे मांडला.
समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी :- प्रा. तुलाराम चांदेवार, मुख्य नियामक (CM) नागपूर विभाग हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील डीसले ( पुणे ) होते.
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा.बाळासाहेब माने ( मुंबई ) होते.
कार्याध्यक्ष,प्रा. संपतराव गर्जे (पुणे ) उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून नागपुर विभाग राज्य प्रतिनिधी उदय सुपेकर, डॉ.प्रतिभा बिश्वास, प्रा. बापू खाडे, प्रा. रोहिणी कारंडे हे होते.
प्रमुख उपस्थिती तथा प्रशिक्षणाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. डॉ. पांडुरंग कंद, डॉ. सुजाता शेणई, डॉ. हेमराज निखाडे, प्रा. दिलीप जाधव, प्रा. ज्योती जोशी, प्रा. डॉ. स्मिता भुसे इत्यादी होते.

तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी, जिल्हा महिला प्रतिनिधी उपस्थित राहिले. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नागपूर विभागाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक विभागाने केले होते.

सदर ऑनलाइन प्रशिक्षणात नागपूर विभागातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे संचालन प्रा.विजया मने गडचिरोली, तर आभार प्रा. मेघा राऊत नागपूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ.ज्ञानेश्वर हटवार प्रा. सुरेश नखाते, प्रा.पवन कटरे, डॉ.दिशा गेडाम प्रा.आशा आकरे, प्रा राजेश डंभारे, प्रा जितेंद्र टिचकुले, प्रा ऋषी दिघोरे, प्रा.सारंग श्रीरामे प्रा. गिरीश काळे, प्रा.अमृत मोहतुरे, प्रा. विद्या गोंगल, प्रा.. विद्या कुमरे, प्रा. दिलीप करंबे, प्रा. दमाहे सर, प्रा.प्रीती कांबळे, प्रा. मोरेश्वर कन्नाके, प्रा. सारिका मांदाडे, प्रा चेतन नाकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments