Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे लाईनगुडा या अति दुर्गम भागात ब्लॅंकेटचे वितरण ‌.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे लाईनगुडा या अति दुर्गम भागात ब्लॅंकेटचे वितरण ‌.

विरुर स्टेशन :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा राजुराचे वतीने लाईन गुडा अति दुर्गम भागात 27 नोव्हेंबर रोज रविवारला भारतीय संविधान दिनाच्या औचित्य साधून ब्लॅंकेट वितरण चा उपक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विरुर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल होते विशेष अतिथी म्हणून मुल येथील पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सतीश राजूरवार तर प्रा. प्रभाकर धोटे होते सामाजिक दायित्व जोपासत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून असे अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रा. महेश पानसे यांनी स्पष्ट केले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास नेहमी तप्तर असल्यास सांगितले त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे अध्यक्ष ॲड. राहुल थोरात संजय रामटेके जगतसिंग वधावन राकेश कलेगुरवार लोकेश पारखी, अनिल कुमार गिरमिल्ला कैलास कार्लेकर गौरव कोडापे, तसेच विरुर स्टेशन येथील पत्रकार व जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणेदार राजुरा संतोष दरेकर सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे डोंगरगाव येथील उपसरपंच प्रकाश चव्हाण जंगु मडावी यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अनंत डोंगे यांनी केले संचालन ॲड. राहुल थोरात यांनी केले तर आभार लोकेश पारखी यांनी मांडले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments