येत्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या राज्यभरात संयुक्त दौरा असून या दौऱ्यात आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम हे आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश घेणार असल्याचे माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली आहे.
दीपक दादा आत्राम हे अहेरी विधानसभेत आदिवासी विद्यार्थी संघ या संघटनेचे सर्वेसर्वा असून या पूर्वी ते अपक्ष म्हणून आमदार निवडून आले आहेत, मागील वेळेस त्यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती पण त्यांना अपयश आले, अहेरी विधानसभा ही अशी विधानसभा होती ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी ची युती असतानाही दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे होते, आमदार म्हणून निवडून आले तेव्हा तसेच मागील विधानसभा निवडणुकीतही दीपक दादाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भक्कम पाठिंबा होता, मागील जीप अध्यक्ष अजय ककडलावार हे सुद्धा दीपक दादा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात पण या पक्ष प्रवेशात दीपक दादा आणि अजय ककडलावार यांचे वेगवेगळे मतप्रवाह असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे, मात्र दीपक दादा आत्राम हे भाजपवासी होणार ही खबर पक्की असल्याचं जानकारांचं म्हणणं आहे
माजी आमदार आत्राम यांच्या भाजप पक्षप्रवेश निश्चित*?
RELATED ARTICLES