मुल;
ग्रामोद्योग व स्वदेशी चळवळीला चालना मिळावी हा उदात्त हेतू ठेवत दरवर्षी मुल येथे श्रीकृष्णा ग्रुप व जलतरण संघटने तर्फे व्हाट्सएपच्या माध्यमातून जनतेला खादी वस्त्र खरेदी करण्यासाठी आवाहन केल्या जाते, एरवी कमी विक्री होत असताना या दिवशी मात्र जनतेचा भक्कम प्रतिसाद असतो, या दिवशी खादी खरेदीवर विशेष सूट सुद्धा दिल्या जाते, दरवर्षी चा हा उपक्रम माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांना मुल परिसरात दौऱ्यावर असताना माहिती झाला आणि त्यांनी आवर्जून मुल येथील खादी ग्रामोद्योग केंद्राला भेट दिली, मुल परिसरात तयार झालेल्या विविध स्वदेशी वस्तूंची त्यांनी खरेदी सुद्धा केली , त्यांच्या समवेत भाजप नेते व चंद्रपूर चे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपचे मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, जलतरण संघटनेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते, माजी केंद्रीय मंत्र्यांनी या उपक्रमाला भेट देत उत्साह द्विगुणित केल्याबद्दल आयोजक तसेच ग्रामोद्योग कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची मुल येथील खादी ग्रामोद्योग ला भेट
RELATED ARTICLES