मुल येथील चंद्रपूर रोडवरील बुध्दगिरी डोंगरावर 4 नोव्हेंबर ला दरवर्षी मोठ्या जल्लोषात बुध्द बांधवांच्या वतीने बुध्दगिरी वर्धापन दिन साजरा केल्या जातो, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा तसेच भाविकांसाठी वेगवेगळ्या खाद्य पदार्थाचे स्टॉल्स लावण्यात येतात, बुध्द बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज भय्या अहीर यांनी सदर स्थळाला आज भेट दिली, स्थानिक आयोजन समिती च्या वतीने आज बुध्दगिरी येथे स्वागत करण्यात आले, स्थानिक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत भय्याचें स्वागत करून आभार मानण्यात आले, आयोजन समिती काजू खोब्रागडे,रंगनाथ पेडुकर,पुरुषोत्तम साखरे, कुमार दुधे, सुजित खोब्रागडे,विनोद निमगडे, अतुल गोवर्धन, बालू दुधे, सुरेश फुलझेले, अनिकेत वाकडे, डॉ इंदूरकर तसेच अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, माजी केंद्रीय मंत्री आपल्या आनंदात सहभागी झाल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता
माजी केंद्रीय मंत्री हंसराज भय्या अहिर यांचे मुल बुध्दगिरी येथे स्वागत
RELATED ARTICLES