Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedमाजी केंद्रीय मंत्री हंसराज भय्या अहिर यांची मुल बुध्दगिरी ला भेट

माजी केंद्रीय मंत्री हंसराज भय्या अहिर यांची मुल बुध्दगिरी ला भेट

मुल शहरातील चंद्रपूर रोड वरील डोंगरावर 18 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धाची मूर्ती सापडली होती, बुद्ध बांधवांनी मोठ्या मनोभावाने सदर मूर्तीची प्रतिष्ठापना त्याच जागी केली, तेंव्हा पासून मुल शहरातील या डोंगराला बुद्धगिरी अस नाव पडले असून 04 नोव्हेंबर या दिवसाला दरवर्षी बुध्दगिरीचा वर्धापन दिवस साजरा केला जातो, या दिवशी परिसरातील बुद्ध बांधव हजारोच्या संख्येने या स्थळाला भेट देतात,
माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज भय्या अहिर यांनी हा स्थळाला भेट देत बुद्ध बांधवांचा उत्साह वाढवला, हंसराज भय्या यांनी या स्थळावरील बुद्ध मूर्तीची पूजा अर्चना केली, भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांसाठी वेगवेगळया ठिकाणी अनेक स्टॉल लावण्यात आले होते, भय्यानी स्वतः उपस्थित राहत भाविकांना स्टॉल वरून पुरी भाजी, भोजन दान, मसाला भाताचे वितरण केले, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नप उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे, महासचिव चंद्रकांत आष्टनकर, माजी नप सभापती प्रशांत समर्थ, माजी नगरसेवक प्रशांत लाडवे, राकेश ठाकरे,प्रशांत बोबाटे, महेंद्र करकाड़े, प्रमोद कोकूलवार, अविनाश वरगटीवार, रंगनाथ पेडुकर, पुरुषोत्तम साखरे, काजू खोब्रागडे, अतुल गोवर्धन, सुजित खोब्रागडे, विनोद निमगडे, सुरेश फुलझेले, बाळू दुधे तसेच अनेकांची उपस्थिती होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments