यावर्षी मोसमी वाऱ्याचा पाऊस म्हणजे मान्सून जबरदस्त बरसला, गावाखेड्यातील तलाव बोळ्या फुल्ल भरल्या, अनेक ठिकाणी अतिवृष्टी मुळे शेतकऱयांचे पीक उध्वस्त झाले, मात्र बळीराजाने काहीतरी हिकमती करत आपल्या शेतात पिकांची लागवड केली, काही ठिकाणचे पीक पण चांगले आहेत, अश्यातच एक बातमी शेतकऱ्यांना पुन्हा चिंता वाढवणारी आहे, यंदा मान्सून हा दरवर्षी पेक्षा 15 दिवस आधीच परतणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, 17 सप्टेंबर ही मान्सून परतण्याची तारीख असते पण यावर्षी सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात च मान्सून परतणार अशी माहिती येत आहे, ही बातमी शेतकऱ्यांना चिंता वाढवणारी असून पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे*