गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) यांना नुकताच राज्यस्तरीय वूमन आचिव्हर्स अवार्ड 2022 देण्यांत आला, सदर पुरस्कार हा ऑन धीस टाईम मीडिया या संस्थेकडून देण्यात आला, नागपूर येथील सुरेश भट सभागृहात रेशीमबाग येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रमासाठी मा खासदार सुप्रियाताई सुळे या आभासी पद्धतीने उपस्थित होत्या, सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित, श्रीमती रुबिना पटेल, श्रीमती स्नेहा भरत धोटे, डॉ प्रवीण धांडिगावकर यांची प्रत्यक्ष रित्या विशेष उपस्थिती होती, भाग्यश्रीताईनि दिन दलित, आदिवासी, महिला यांच्या उथाणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात केलेल्या कार्यासाठी तसेच राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात युवतीसाठी प्रेरणादायी ठरेल अशे कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला, या विशेष गौरव पुरस्कार प्राप्तीसाठी भाग्यश्रीताई चे सर्वत्र अभिनंदन होत आहे
मा. जीप अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम) यांना राज्यस्तरीय वूमन आचिव्हर्स अवार्ड 2022
RELATED ARTICLES