अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुल च्या वतिने विद्यार्थ्यांसाठी आयोजित शौर्य 2023 व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन थाटात पार पडले.
यावेळी उद्घाटक म्हणून रामनगर चंद्रपूर चे पी एस आय मा. श्री स्वप्नील जी गोपाले व प्रमुख अतिथी म्हणुन विदर्भ प्रांत मंत्री शक्ती जी केराम प्रमुख उपस्थिती प्रभाकरजी भोयर,नगरमंत्री प्रणय भोयर व सचीन बल्लावार सर उपस्थित होते. सदर शिबीर हे योग् भवन क्रीडा संकुल मुल येथे घेण्यात आले, सर्वप्रथम वंदनीय भारत माता आणि युवकांचे स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत दीप प्रजलवन करण्यात आले
या शिबिर मध्ये १० व १२ नंतर काय ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभविप परिचय,भाषण व संवाद कौशल्याचा विकास असे विविध सत्र घेण्यात आले.
या वेळेस उपस्थित कार्यकर्ते ओमसाई गिरडकर,यश रामटेके, आकाश अंबुले,प्रिया रायपुरे,नंदिनी रामटेके,कशिष तलांडे,पियूष कवाडकर तसेच ब्रम्हपुरी विद्यार्थी नगर विस्तारक भावेश बोरजवाडे आणि गडचिरोली व आरमोरी भाग संयोजक प्रणय म्हस्के यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी पार पडले.या शिबिराचा समारोप वंदे मातरम् या गीताने करण्यात आला. शिबिरात मुल शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला