Thursday, February 22, 2024
Homeमूलमुल तालुका ग्रामपंचायत निवडणुक निकाल

मुल तालुका ग्रामपंचायत निवडणुक निकाल

नुकताच मुल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून भारतीय जनता पक्ष समर्थीत पॅनल हा तालुक्यातील तीन जागी विजयी झाला असून तिन्ही जागी मोठ्या फरकाने विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे, उश्रला ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका नर्मलवार यांनी 803 मते मिळवत काँग्रेस पॅनल च्या जया सोनुले यांचेवर तब्बल 346 मतांनी प्रचंड विजय मिळवला,
गडीसुरला ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या शारदा येनूरकर यांनी 1144 मते घेतली तर काँग्रेसच्या पौर्णिमा ठाकरे यांनी 605 मते घेतली, येनूरकर यांनी तब्बल 539 मतांच्या फरकाने विजयश्री खेचली,
बोनडाला ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सोनल बांगरे यांनी 365 घेतली तर काँग्रेसच्या शालूबाई फाले यांनी 238 मते घेतली, यात बांगरे यांचा 127 मतांनी विजय झाला,
अश्याप्रकारे भारतीय जनता पक्षाने विजय मिळवलेल्या तीन्ही ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता स्थापन झाली
काँग्रेस पक्षाने दोन ग्रामपंचायत मध्ये एकहाती विजयश्री खेचली यात आकापूर ग्रामपंचायत मध्ये 7 ही सदस्य व सरपंच हे काँग्रेस पॅनल चे निवडून आले , काँगेसचे भास्कर हजारे याना 235 तर भाजपचे नरेंद्र तिवाडे याना 117 मते मिळाली, हजारे यांनी 118 मतांनी विजय मिळवला
अतिशय प्रतिष्ठेच्या बेंबाळ ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पॅनल ने 267 मतांनीविजय मिळवला, काँग्रेसचे चांगदेव केमेकार याना 1279 तर माजी उपसरपंच व भाजप उमेदवार मुन्ना कोटगले याना 1012 मते मिळाली,
अश्याप्रकारे आकापूर व बेंबाळ या 2 ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेस नि एकहाती बाजी मारली
चकदुगाला ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस च्या प्रीती भांडेकर
यांनी अपक्ष अरुणा गुणटोकवार यांचा अवघ्या 16 मतांनी पराभव करत निसटता विजय मिळवला
बाबराला ग्रामपंचायत मध्ये अतिशय चुरशीच्या लढतीत काँग्रेस च्या धीरज गोहणे यांनी 174 तर भाजपच्या भक्तदास गोहणे यांनी 161 मते घेतली, या अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसने अवघ्या 13 मतांनी विजय मिळवला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments