मुल नप चे मुख्याधिकारी म्हणून मुल तहसील कार्यलयातील नायब तहसीलदार श्री यशवंत पवार यांनी मागील अनेक वर्षांपासून अतिशय सुबक व व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने कार्यभार सांभाळला होता, आता मुल नपला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभले असून श्री संदीप दोडे हे आज रुजू झाले आहेत, यशवंत पवार यांचेकडून संदीप दोडे यांनी पदभार स्वीकारला असून आता नप ला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभल्याने जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या दिसणार आहेत, सदर नप ही पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील असून , सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे सातत्याने होत असतात त्यामुळे येथील मुख्याधिकारी पद हे अतिशय महत्त्वाच समजलं जातं, नवीन मुख्याधिकारी या पदाला कसा न्याय देणार याकडे जनतेच लक्ष लागून आहे