अखिल भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्नित मूल तालुका पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेचे बुधवार दिनांक ०८/०२/२०२३ रोजी स्थानिक मूल तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात सायंकाळी ६वाजता एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे विद्यमान अध्यक्ष अशोक येरमे उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे उपाध्यक्ष रविंद्र बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत निवडप्रक्रीया पार पडली.
या सभेत *दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम यांची अध्यक्षपदी , तर सचिवपदी दै.सकाळ चे तालुका प्रतिनिधी विनायक रेकलवार आणि उपाध्यक्ष म्हणून दै.तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी युवराज चावरे यांची आणि सहसचिव म्हणून राजोलीचे ग्रामीण प्रतिनिधी विजय पाकमोडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया मावळते सचिव गंगाधर कुनघाडकर यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.
उपस्थित सर्व कार्यकारिणी सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत व अभिनंदन केले.