Thursday, October 10, 2024
Homeमूलमुल परिसरात विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यू

मुल परिसरात विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यू

आज दिनांक २/३/२०२३ ला अंतरगाव पारडवाही येथील शेतात वन्यप्राण्यापासुन रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने अंदाजे दोन वर्षाच्या नर आस्वलाचा मृत्यू झाला….
मूल येथील शेतकरी सूधीर कावळे यांनी आपली शेती सुभाष नगर मूल चे गोपीनाथ मंगरू शेंडे याला करण्यासाठी दिली. गोपीनाथ शेंडे यांनी वन्यप्राण्यापासुन मका पीकाच्या रक्षणा साठी महावीतरणच्या पोलवरून आकडा टाकुन शेताच्या सभोवताल तार लाऊन त्यात विद्युत प्रवाह सोडला. त्यात विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यू झाला. ही घटना माहीत होताच मूल चे क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि या सर्व घटनेची माहिती विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे व चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे यांना दीली आणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ताब्यात घेतले व त्याचे कडुन विद्युत प्रवासासाठी वापरलेले वायर आणि आकडा टाकण्यासाठी वापरलेली काठी जप्त केली.. घटनास्थळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे, महावितरण मूल चे सहाय्यक अभियंता पंकज उजवने, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, प्राणी उपचार केंद्र चंद्रपूर चे डॉक्टर कुंदन पोडचलवार, क्षेत्रसहाय्यक मोरेश्वर मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोले, वनरक्षक राकेश गूरनुले व वनमजूर उपस्थित होते..मृत अस्वलाला मुल येथे आनुन शवविच्छेदन करण्यात आले व नंतर दहन करण्यात आले….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments