नवरात्री चे औचित्य साधत मुल पोलीस स्थानकात विविध शारदा- दुर्गा मंडळाच्या महिला पदाधिकाऱयांचा मार्गदर्शन पर महिला मेळावा संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे हे होते, कार्यक्रमाचे आयोजन तथा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत , महिला सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला ताई ठाकरे, प्रा डॉ किरण कापगते, माजी नगरसेविका लीना फुलझेले, दक्षता समितीच्या सदस्य तसेच विविध शारदा-दुर्गा मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या,पोलीस निरीक्षक राजपूत यांनी नवरात्री उत्सवात महिलांनी काळजी घेण्याचे आवाहन केले, उत्सवाचा आनंद जरूर घ्या पण स्वताची संपूर्ण काळजी घ्यावी असं ते म्हणाले, कुठल्याही प्रकारची शांतता भंग होतांनी दिसत असेल तर पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले, प्रा डॉ किरण कापगते यांनी प्रत्येक स्त्री मध्ये दुर्गेचा अवतार असतो ,वेळ पडल्यास प्रत्येक स्त्री ने दुर्गा बनून लढावे अशे आवाहन आपल्या भाषणात केले, लीना फुलझेले यांनी सर्वांना शुभेच्छा देत नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्यास सांगितले, अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी कायदेविषयक माहिती देत पोलीस निरीक्षक यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले
मुल पोलीस स्टेशन मध्ये नवरात्री निमित्य महिला मेळावा संपन्न
RELATED ARTICLES