मूल- स्थानिक मूल येथील सेंट अॅन्स हायस्कूल येथे इयत्ता 7 वीत शिकत असलेला विद्यार्थी चिं. ओंकार आझादब्रम्हा नागोशे हा वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षात तबल्याच्या प्रारंभीक, प्रवेशिका(पूर्व) आणि प्रवेशिका (पूर्ण) अशा तिन परीक्षा सलग प्रथम श्रेणीत पास केलेल्या आहेत. ओंकार हा स्थानिक कला निकेतन येथून श्री अशोक येरमे सर यांचेकडून चौथ्या वर्गापासून तबल्याचे शिक्षण घेत आहे. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक संगीत व वाद्य वाजन यात उदासीनता दिसून येत आहे त्यातही चिरंजीव ओंकार याने संबंधित तीन परीक्षेत सुयश प्राप्त केल्याने सरविकडे कौतुक होत आहे, ओंकार ने आपल्या यशाचे श्रेय कलनिकेतन चे संचालक अशोक येरमे, वडील आझादब्रम्हां नागोसे, आई मनीषा नागोसे, आजोबा शरद नागोसे, आजी व गुरुजनांना दिले आहे