महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गायरान जमिनींवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे, अनेक ठिकाणी गरीब लोकांनी घरे बांधत ते वास्तव्यास आहेत पण काही ठिकाणी मात्र धनधांडग्यानी शाळा, हॉटेल किंवा आपली प्रतिष्ठाने बांधत त्या जमीनी बळकावल्या आहेत, यावर एक याचिका कर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, न्यायालयाने ती याचिका आता निकाली काढली असून अतिक्रमण शासनाने काढण्याचा आदेश दिला, त्यानुसार सर्व अतिक्रमण धारकांना शासनाने अतिक्रमण काढत जागा 31 डिसेंबर 2022 पर्यंत खाली करून देण्याचे आदेश दिले आहेत, मुल शहरातील अतिक्रमण धारकांना पण या संबंधात नोटीस प्राप्त झाल्यानंतर सर्वांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व क्षेत्राचे आमदार नाम सुधीर मुनगंटीवार यांचे कडे धाव घेतली, शहर भाजप अध्यक्ष प्रभाकर भोयर व माजी नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांचे नेतृत्वात जमतेच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नाम मुनगंटीवार यांची भेट घेतली, जिल्हाधिकारी गौडा यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नाम मुनगंटीवार यांनी संबंधित मंत्री महोदय व मुख्य सचिव यांचेशी चर्चा केली, राज्य शासना तर्फे उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत गरीब जनतेचे अतिक्रमण काढू नये, धन धांडग्यांचे काढावे अशी मागणी याचिकेत काढण्याची सूचना केली, त्याचप्रमाणे याचिका निकाली लागेपर्यंत कोणतेही गरीब जनतेचे अतिक्रमण न काढता दिलासा द्यावा अश्या सूचना ना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला केल्या, मुल वासीय जनतेने सुधीरभाऊ चे आभार मानले आहे, प्रसंगी जिल्हाधिकारी गौडा, ओ एस डी इंगोले यांची उपस्थिती होती, शिष्टमंडळात मुल भाजप अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, सौ प्रभा चौथाले, मनीषा गंडलेवार तसेच नागरिक उपस्थित होते
मुल येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येऊ नये-ना. सुधीर मुनगंटीवार
RELATED ARTICLES