मूल:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 14 ते 16 फेब्रुवारी 2023. जिल्हा क्रीडा संकुल, बारामती (पुणे) येथे
आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील कोकण, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर आणि पुणे या आठ विभागातील खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत नागपूर विभागाकडून 17 वर्षांखालील मुलींमध्ये जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे-डो असोसिएशन मूल यांच्याशी संलग्न असलेल्या कराटे अँड फिटनेस क्लब मूल ची कु. दिव्या किशोर नरड हिने – 44 किलो. या वजन गटात आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले आहे.दिव्या ही मुल शहरातील सेंट अँन्स हायस्कूल मध्ये नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे.तिला कराटे या खेळात रुची असल्याने कमी कालावधीतच तिने अनेक स्पर्धा गाजविलेल्या आहेत,बऱ्याच स्पर्धामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स ह्या मेगा इव्हेंट ची ट्रॉफी ही जिंकली आहे.मात्र कोरोना काळात दोन वर्षे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित न झाल्याने ही शालेय कराटे क्रीडा तिच्यासाठी पहिलीच होती.स्पर्धेस्थळी खेळाडूच्या कोच ची भूमीका साहिल खान आणि अमान खान यांनी योग्यरीत्या बजावली.
दिव्याला जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख आणि क्लबचे मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे सर,
कराटे अँड फिटनेस क्लब मूलचे संचालक-प्रशिक्षक इम्रान खान सर आणि निलेश गेडाम सर, पालक व शहरवासी यांनी भरभरून आशीर्वादसह शुभेच्छा दिलेल्या आहेत.