चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूर च्या वतीने मुल शहरात पतसंस्था कर्मचाऱ्यांना दिन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता, स्थानिक धनश्री नागरी सहकारी पतसंस्था च्या केशवराव हेडगेवार सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित केला होता, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते यांची उपस्थिती होती, भाग्यश्री पतसंस्था मुल चे मार्गदर्शक अनिल मोगरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,सहकारी बोर्डाचे सहकार अधिकारी भारत फालके ,धनश्री पतसंस्था चे अध्यक्ष अजय गोगुलवार, धनश्री चे कार्यकारी अधिकारी प्रा रामभाऊ महाडोळे, भाग्यश्री च्या अध्यक्षा सौ अनिता मोगरे यांची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती, दीप प्रजलवन करीत प्राचार्य ते क कापगते सरांनी प्रशिक्षण चे उदघाटन केले, सर्व उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झालीत, प्रशिक्षणाला धनश्री, भाग्यश्री तसेच इतर पतसंस्था चे कर्मचारी उपस्थित होते, सहकारी बोर्डाचे सहकार अधिकारी भारत फालके आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय शिस्तबद्ध दोन दिवसीय प्रशिक्षण दिले