सतत दोन ते तीन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे गणेश उत्सवावर विरजण आले होते त्यामुळे भक्तांना नाईलाजास्तव आपल्या उत्साहावर पाणी फेरावे लागले होते, पण यावर्षी शिंदें – फडणवीस सरकारने कोरोना निर्बंध नसल्याने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले ,स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत उत्साह वाढवला, मुल शहरात यावर्षी अतिशय उत्स्फूर्तपणे गणेशोत्सव साजरा झाला, गणेश मंडळांनी तसेच डी जे मालकांनी उत्सवात सूट मिळावी अशी विनंती सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली, सुधीरभाऊंनि डी जे साठी सूट देण्याचे आवाहन प्रशासनाला केल्याने , नियमात राहून डीजे वाजले, त्यामुळे गणेश भक्तांनी सुधीरभाऊंचे आभार मानले, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मुल शहरात मिरवणुकांची सांगता झाली, पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता, नगर प्रशासनाने सर्व सोयी सुविधा ठेवलेल्या होत्या,नगर प्रशासनाकडून सर्व मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, मुख्याधिकारी अजय पाटणकर हे स्वतः आपल्या कर्मचातयांसंमवेत उपस्थित होते, गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता