Saturday, December 7, 2024
Homeमूलमुल येथे भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव साजरी.

मुल येथे भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव साजरी.

विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल यांच्यावतीने विश्वकर्मा मंदिर येथे तालुक्यातील पांचाळ समाज बांधव आणि भगिनींच्या या उपस्थितीत विश्वकर्मा जयंती महोत्सव व समाज मेळावा 3 फेब्रुवारी 2023 रो शुक्रवारला पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंतराव जिरकुंडवार अध्यक्ष विश्व ब्राह्मण पांचाळ समाज मुल, प्रमुख पाहुणे मा . डाॅ. शाम कुंदोजवार चंद्रपूर, मा. श्री विनोद श्रीकुंडवार से .नि. शिक्षक, मा. श्री मोतिभाऊ टहलियानी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुल ,श्री प्रकाश विरगमवार उपस्थित होते. भगवान विश्वकर्माच्या प्रतिमेला मार्लारपण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु रांगोळी स्पर्धा भावगीत स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दुर्बल घटकातील विधवा दोन महिलांना साळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बचत गट उपक्रमातून मंडळाला आथिर्क सहाय्य दिला बदल श्री संदीप बदेलवार यांच्या समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.वर्ग १० वी १२ मध्ये समाजातुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ६०% पर्यंत गुणवंत विद्यार्थी यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री संजय येरोजवार कार्याध्यक्ष श्री विद्याधर मेडपल्लीवार उपाध्यक्ष श्री विलास यलचलवार सहसचिव श्री बाबुराव गनलावार श्री दिलीप कटलावार श्री अभिजित चेपुरवार श्रीमती अल्का राजमलवार श्री दिलीप अलगुणवार श्री विनायक कत्रोजवार, अभिजित राजुरवार, प्रदिप चिटलोजवार, सौ.लता जिरकुंटवार सौ.नंदा तासलवार सौ.शिल्पा येलचलवार सौ.विना गनलावार सौ.सरला वैरागडवार ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री विजय वैरागडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव श्री विलास यलचलवार यांनी केले सहभोजनाने या उत्सापूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments