तालुका मुल प्रतिनिधी
आज दिनांक 14 मार्च 2023 रोज मंगळवारला सरकारी, निमसरकारी, शिक्षक – शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून आज तहसिल कार्यालय मुल येथे कर्मचार्यांच्या एकुण १८ मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला . यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, आरोग्य विभाग, वनविभाग, कृषी विभाग त्याचप्रमाणे अन्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात १०० टक्के प्रतिसाद नोंदविला. सकाळी ११ वाजता संपाला सुरुवात झाली . पंचायत समिती मधून कर्मचारी एकजुटीचा विजय असो, एकच मिशन – जुनी पेंशन या घोषणा देत तहसिल कार्यालय मुल येथे सर्व संपकरी एकत्र आले . व पेशन गीताने संपाची सुरुवात झाली . आजच्या दिवस भरात मुल मधील सर्व कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून संपकरी बांधवांना मार्गदर्शन केले . संपातीन अनेक कर्मचाऱ्यांनी स्फुतीगीत सादर केली व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा उहापोह केला . व सायंकाळी ठिक ५ : ०० वाजता वंदे मातरम् गीताने संपाच्या पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली .