विश्व हिंदू परिषद शाखा मुल च्या वतीने विहिप स्थापना दिन त्याचप्रमाणे जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला, शहरात विहीप कार्यकर्त्यांनी बाईक रॅली तसेच राधा कृष्ण ची झाकी काढण्यात आली, विहिप बजरंग दल नेते विपीन भालेराव यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम घेण्यात आला, बाईक रॅली चा समारोप गुजरी चौकात करण्यात आला, नप चे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते, गुजरी चौकात कार्यकर्त्यांनी दही हंडी फोडत उत्सव साजरा केला, मुल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेबांनी संपूर्ण रॅली मध्ये स्वतः उपस्थित राहत चोख बंदोबस्त ठेवला,