महाशिवरात्री निमित्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवटेकडी उत्सव समिती च्या वतीने मुल येथील चंद्रपूर रोड वरील शिवटेकडी वर विविध धार्मिक कार्यक्रम घेत महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे,या शिवटेकडी वर सुमारे 30 वर्षांपूर्वी जनार्धन मस्के पुजारी नामक निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने या परिसरात भगवान शंकर मूर्तीची स्थापना केली, परिसरात भगवान हनुमान, तिरुपती, पदमावती, गणेशजी यांची पण मंदिर आहेत, अनेक जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार जुन्या काळात इथे जंगल देवांची पूजा अर्चा व्हायची, हा परिसर मस्के यांनी जागृत केला, कालांतराने जनार्धन म्हस्के यांचे वृद्धापकाळाने निधन झाले , नंतर शिवटेकडी उत्सव समिती च्या माध्यमाने इथे शिवटेकडी वर महाशिवरात्री चा कार्यक्रम घेण्यास सुरुवात झाली, दरवर्षी मुल शहर व परिसरातील हजारो भाविक इथे दर्शन घेतात, याहीवर्षी पूजा, महिला मंडळाचे भजन , उपवास खिचडी वितरण अशे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत, सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवटेकडी उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे