Thursday, February 22, 2024
Homeमूलमुल शहरातील नवनिर्मित इमारतींना व चौकाला महापुरुषांची नावे द्या- प्रा सौ किरण...

मुल शहरातील नवनिर्मित इमारतींना व चौकाला महापुरुषांची नावे द्या- प्रा सौ किरण कापगते यांची नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी

मुल शहरात नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकास निधीतून बेरोजगारांना एकत्रित व्यवसाय करण्यासाठी व्यापारी संकुल, शेतकऱ्यांना आठवडी बाजार तसेच दररोज गुजरी भरवण्यासाठी हायटेक बाजार संकुलाची निर्मिती झालेली आहे , सदर दोन्ही इमारती ह्या चिरकाळ राहणार असून येणाऱ्या पिढीना महापुरुषांची सदैव प्रेरणा मिळत राहण्यासाठी नवनिर्मित व्यापारी संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज, नवीन बाजार परिसराला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची नावे देण्यात यावी. त्याचप्रमाणे चामोर्शी नाका चौकाला स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांची नावे देण्यात यावी अशी मागणी एका पत्रकान्वये प्रा डॉ सौ किरण कापगते यांनी वने , सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे केलेली आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments