सध्या मे महिन्यात सूर्य आग ओकत असून चंद्रपूर सारख्या जगात सर्वात गरम असलेल्या जिल्ह्यात नागरिकांची लाही लाही होत आहे, अश्यातच आज मुल शहरातील रेल्वे फाटक च्या ओव्हर लोड वाहतूक प्रतिबंधक रॉड ला एका ट्रक मधील मशिनरी वाहतूक करताना उंच असल्याने अडकली आणि या राष्ट्रीय मार्गावरील सर्व ट्रॅफिक च थांबली, काही वेळातच कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा च्या रांगा लागल्या, उन्हाच्या तडाक्याने अडकलेल्या प्रवाश्यांना, वाहनधारकांना त्रास होत होता अश्यातच मुल शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्याम उराडे, कुमार दुधे, साईनाथ गुंडोजवार यांनी प्रसंगावधान व समयसूचकता राखत अडलेल्या नागरिकांसाठी थंड पाणी व बिस्कीट ची व्यवस्था केली, साधारणपणे 5 ते 6 तास ही वाहतूक खोळंबली होती, शहरातील युवक गुड्डू हेडाऊ,सौरव चिलके, रोहित अडगुरवार या युवकांनी मदत करत फसलेले वाहन बाहेर काढून वाहूतुक सुरळीत करण्यास मदत केली, शहरात सर्व युवक सामाजिक कार्यकर्ते श्याम उराडे, कुमार दुधे, साईनाथ गुंडोजवार, गुड्डू हेडाऊ, सौरव चिलके, रोहित अडगुरवार व उपस्थित सर्व युवकांचे कौतुक होत आहे