Thursday, February 22, 2024
Homeमूलमुल शहरात क्रिकेटपटू कडून सचिन तेंडुलकर यांचा 50 वा वाढदिवस साजरा

मुल शहरात क्रिकेटपटू कडून सचिन तेंडुलकर यांचा 50 वा वाढदिवस साजरा

कोणत्या व्यक्तीला कशाचे वेड राहील, कोण कोणत्या व्यक्तीचा फॅन राहील, कोणाला कोणती आवड राहील या गोष्टींचा काही थांगपत्ता नसतो, अशाच एक प्रसंग मुल शहरातील कर्मवीर महाविद्यालयावरील ग्राउंड वर घडला, सचिन तेंडुलकर ची कारकीर्द संपून एक दशक होत आले पण त्याचे चाहते आजही अस्तित्वात आहेत, कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अनेक वर्षांपासून क्रिकेट चाहते एकत्र येत त्यांनी मास्तर ब्लास्टर सचिनचा 50 वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला, छोटू मोहूरले यांनी पुढाकार घेत शहरातील सर्व जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंना एकत्रित करत हा सोहळा घडवून आणला, सचिनचे बॅनर बनवून , फटाक्यांची आतिषबाजी करत , केक कापून सचिनच्या छायाचित्राला केक भरवण्यात आला व नंतर अल्पोपहार वितरित करत सचिनच्या आठवणीत सर्व क्रिकेट चाहते रंगले, या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची संपूर्ण मुल परिसरात चर्चा असून आनंदी वातावरण निर्माण झाले आहे , क्रिकेटपटू छोटू मोहूर्ले यांच्या समवेत संदीप मोहबे, प्रवीण मोहूर्ले, प्रशांत केदार, सचिन बल्लावार, हितेश कोकाटे, संजय भुसारी, कमलेश रससे, लक्ष्मण सोयाम,चंदन बिलवणे, ललित लांजेवार व अनेक क्रिकेट चाहत्यांची उपस्थिती होती
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments