Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedमुल शहरात प्रस्तावित सुरजागड मालधक्का विरोधात प्रचंड जणआक्रोश मोर्चा

मुल शहरात प्रस्तावित सुरजागड मालधक्का विरोधात प्रचंड जणआक्रोश मोर्चा

मुल शहरात सुरजागड प्रकल्पाच्या प्रस्तावित मालधक्का विरोधात आज मुल शहर बचाव संघर्ष समिती-मॉर्निंग ग्रुप- शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या सहभागात प्रचंड मोठा मोर्चा निघाला, हजारो च्या संख्येने विद्यार्थी व नागरिक रस्त्यावर उतरले होते आजच्या मोर्चाची ठळक वैशिष्ट्ये:-
1 ) मोर्चात मुल शहर बजाव संघर्ष समिती- मॉर्निंग वॉक संघटना यांच्यासोबत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, उलगुलान संघटना, युवा वर्ग, आम आदमी पार्टी, श्रीकृष्णा ग्रुप, साई मित्र परिवार, राईस मिल संघटना, फार्मासिस्ट असोसिएशन,मुल जनरल असोसिएशन मुल,कर्मवीर महाविद्यालय, नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय अश्या अनेक राजकीय पक्ष, विविध संघटनांचे नेते – कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते
2 ) शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड बाबासाहेब वासाडे हे वयाच्या 78 वर्षाच्या पुढे वय असताना तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने मोर्चात पायी चालत सहभागी झाले होते
3) चंदू पाटील मारकवार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भगत सिंग, महात्मा गांधी, वी. दा . सावरकर यांचे लढण्याचे विचार वेगवेगळे असले तरी सर्वांचे स्वातंत्र्य हेच उद्दिष्ट होते त्याचप्रमाणे या लढ्यात वेगवेगळ्या संघटना आहेत,कदाचित लढा देण्याच्या बाबतीत छोटे मोठे मतभेद असतील पण सर्वांचे उद्दिष्ट एकच असल्याचे सांगत लढ्याचे कौतुक केले
4 ) मोर्चा कर्मवीर महाविद्यालयातुन सुरू होत गांधी चौकात पोहचला तिथून इतर शाळा संघटना सामील झाल्या, मोर्चा इतका विशाल होता की तहसील कार्यालयात पोहचल्यावरही शेवटचे टोक चौकापर्यंत होते
5) महाविद्यालयातील विद्यार्थीनिनि आक्रमक भूमिका घेत नारे देत स्वतः उप विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यास पुढाकार घेतला*
6 ) सुरवातीला नायब तहसीलदार निवेदन स्वीकारायला आल्यावर आंदोलनकर्त्यांनी निवेदन हे उपविभागीय अधिकाऱ्यांना देऊ अशी भूमिका घेताच लागलीच उप विभागीय अधिकारी स्वतः येऊन खेळीमेळीच्या वातावरणात लगेच निवेदन पुढे पाठवत *तुमच्या भावना वर कळवू अशे आश्वासन दिले
7 ) राईस मिल संघटनेकडून मोर्चेकऱयाना बिस्किट पुडे तर मॉर्निंग ग्रुप संघटनेकडून पाणी बॉटल ची व्यवस्था करण्यात आली होती
8 ) मुल पोलिस स्टेशन कडून मोरच्याची चोख पूर्वतयारी केल्या गेली होती, पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेब स्वतः सर्व काळजी घेताना दिसले
9 ) आज संपूर्ण शहरात हॉटेल, पाणठेले, दुकान सर्व जागी मोरच्याची चर्चा दिसली
10) एकंदरीत आयोजक जनसामान्यात मालधक्याचे दुष्परिणाम पटवून देण्यात यशस्वी झाले
*11) मुल बचाव संघर्ष समिती- मॉर्निंग ग्रुप चे सदस्य मोर्चा समाप्तीनंतर कमी संख्येने रेल्वे स्टेशन ला जात स्टेशन मास्टर ला पण निवेदन दिले
@K K

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments