Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedमूल वासियासाठी धोक्याची घंटा*?️?️?️?️?️?️?️?️?️

मूल वासियासाठी धोक्याची घंटा*?️?️?️?️?️?️?️?️?️

एटापल्ली सुरजागड येथून लोहखनीज मोठमोठ्या हायवा ट्रक व्दारे मूल मध्ये आणून साठवणूक करणे व रेल्वेने इतर राज्यात पाठविणे साठी मूल येथील कर्मवीर कॉलेज ग्राऊंड जवळ मालधक्क्याचे काम पून्हा सुरु करण्यात आले आहे . या अवजड हायवा वाहतुक गावाचे मध्यभागातून होण्यामूळे जे चांगले रस्ते आहेत ते पूर्णता खराब होऊन नागरीकांना अपघात व वाहन प्रदुषण यांचा त्रास होईल . या लोहखनीज पावडर मध्ये मानवी शरिरास अंत्यत घातक असलेले घटकद्रव्या पासून दमा कॅन्सर व इतर दुर्धर आजार होतात यासाठी कोणत्याही नागरी वसाहत लगत व गावालगत असा मालधक्का होऊ दिल्या जात नाही जर या प्रस्तावीत डंपीग यार्ड ला आताच इतरत्र न हलविल्यास मूलनगर वासियांना भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे . अहेरी सिरोंचा येथील नागरिकाना विचारून पहावे जगणे मुशकील झाले आहे यात मूलमधील सर्व नागरीक सर्व पक्षीय नेते व सामाजीक कार्यकर्ते यांनी तात्काळ मिटींग घेऊन हा मालधक्का केळझर चिचपली येथील जंगल परिसरात हलविण्यासाठी अंदोलण करून मूलचा मालधक्का बनविणे करिता विरोध करावा व मार्ग काढावा
जर हा यार्ड १ वेळ सुरु झाला तर नंतर हलविता येत नाही याचे गांभिर्य लक्षात घेता या अतिसंवेदनशील मानवी आरोग्यासाठी धोका होऊ नये याकरिता युद्धस्तरावर विनाविलंब कारवाई झाली पाहिजे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments