Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedमृत पिल्लू बाहेर काढत सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचवले गोमातेचे प्राण

मृत पिल्लू बाहेर काढत सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचवले गोमातेचे प्राण

राकेश ठाकरे, अनील मोझेस, डॉ विनायक बेलसरे यांचा पुढाकार

मुल पंचायत समिती च्या मागील परिसरात मागील चार दिवसांपासून एक गोमातेच्या प्रसूती दरम्यान कालवड मरण पावली , सदर कालवडीचे फक्त पाय बाहेर निघाले पण नंतर ती कालवड आतल्या आत गुदमरून मरण पावली, कालवड आत मरण पावली त्यामुळे गोमातेच्या शरीरात विष पसरत गोमाता मरणासन्न झाली, ही बाब सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे, अनिल मोझेस, संतोष वाढई, सुरेश कावळे यांना माहिती होताच त्यांनी परिसरात च राहत असलेले डॉक्टर विनायक बेलसरे व नगर परिषद ला पाचारण केले, स्थानिक मुल चे याच परिसरात लहानाचे मोठे झालेले डॉ विनायक बेलसरे यांनी आपल्या सामाजीक जाणिवेची प्रचिती देत अतिशय शिताफीने मृत कालवडीला बाहेर काढत सामाजिक कार्यकर्ते व नप कर्मचारी यांच्या मदतीने गोमातेचे प्राण वाचवले, नप कर्मचारी अमन सोने, अमित क्षेन्द्रे,करणं सांडे, रवी सांडे, सूर्यकांत अडेट्टीवार,निलेश देवगडे, सुरेश बावणे,रोहित नीमगडे, रोहित दहिवले,तिलक दहिवले, प्रफ्फुल तुंगीडवार यांनी विशेष प्रयत्न केले, सामाजीक कार्यकर्ते राकेश ठाकरे, अनिल मोझेस तसेच डॉ विनायक बेलसरे यांचे आभार गोमाता भक्तांनी मानले
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments