दरवर्षी मोठा दिमाखात साजरा होणारा राज्यस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन यावर्षी सहावा राज्यस्तरीय साहित्य संमेलन दिनांक 8 जानेवारी 2023 ला भंडारा जिल्ह्यातील सानगडी नगरीमध्ये संपन्न होत आहे.वंदनीय तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे गाव हा विश्वाचा नकाशा असतो आणि गावावरून ही देशाची परीक्षा होत असते. यासाठी गावाच्या विकासात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होत आहे.मागील काळात आदर्श पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना सुद्धा या पद्धतीचा पुरस्कार देण्यात आलेला होता.त्याप्रमाणेच या वर्षीच्या सहावा राज्यस्तरीय विशेष जीवनगौरव पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील सिरेगावबांध गावचे सरपंच माननीय दादा पाटील संग्रामे यांना देण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी अनेक नामांकित व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू त्याच प्रमाणे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी येथील विश्वसनीय कार्यकर्ते परिसरातील आमदार,खासदार , सामाजिक कार्यकर्ता , पत्रकार या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात होत असल्याने सानगडी नगरीत आनंदाचे वातावरण सुरू झाले आहे.