मुल तालुक्यातील अतिशय संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरगाव ग्रामपंचायत मधील आदिवासी समाजाच्या युवकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दूरदृष्टी ला सलाम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला, मुल नप चे मा उपाध्यक्ष तथा भाजप नेते नंदकिशोर रणदिवे व येरगाव येथील भाजपचे युवा नेते राजू नागापुरे , महादेव नागापुरे यांच्या नेतृत्वाखाली सदर युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला, सर्वश्री प्रवीण पेंदोर, गणेश तोडासे, जालिंदर पेंदोर, दिलीप कोडापे, कृष्णा मडावी, संतोष कोडापे, मयूर मडावी, गंगाधर जुमनाके या युवकांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते प्रवेश घेतला, जिल्ह्याच्या विकासाला कटिबद्ध आहेच शिवाय येरगाव च्या विकासात कोणतीही कमतरता भासू देणार नाही अशी धारणा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी व्यक्त करत सर्वांचे स्वागत केले