Saturday, December 7, 2024
Homeमूलरंगकर्मीं रंगभूमी वडसा च्या बुकींग कार्यालयाचे उद्घाटन.

रंगकर्मीं रंगभूमी वडसा च्या बुकींग कार्यालयाचे उद्घाटन.

सिजन 22/23 करीता नवनवीन नाट्यप्रयोग झाडीपट्टी रंगभूमीवर सादरीकरण करण्यासाठी रंगभूमी सज्ज…..
आज दि.1 सप्टेंबर रोजी झाडीपटटीतील प्रसिद्ध रंगकर्मीं रंगभूमी वडसा च्या बुकींग कार्यालयाचे उद्घाटन सोहळा झाला. या उदघाटन कार्यक्रमाला सर्वश्री रासेकर टॅक्टरचे संचालक मा.राजुभाऊ रासेकर. अॅड.प्रमोद बुद्धे, जगदिश केळझरकर सर, प्रा .दिपक नाकाडे, डाॅ ओम बन्सोड,रंगकर्मीं रंगभूमी चे निर्माता नितु पाटिल बुद्धे. दिग्दर्शक अनिल नाकतोडे. सुप्रसिद्ध नाटककार श्री प्रदीप बिडकर , बाळकृष्ण ठाकुर. नाट्य कलावंत विलास वट्टी.स्वरबहार अमरकुमार मसराम. ताराचंद पारधी. डेकोरेशन युनीयनचे संचालक शामराव खुणे.विजुभाऊ सहारे.तुलारामजी ढोरे.भैया भोयर.लक्ष्मी डेकोरेशन राजनी चे मालक, वडसातील नाट्य रंगभूमी चे निर्माता ताजुल ऊके. युवराज प्रधान. आसासींग जुनी. संदेश आनंदे. मयुर बोरकर.संदिप कुरवटकर.राम बरडे.प्रफुल्ल वडे व नाट्यक्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते.
रंगकर्मीं रंगभूमीचे निर्माता हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या रंगभूमी च्या माध्यमातून झाडीपटटीतील नाट्य रसीकांचे मनोरंजन करीत आहेत.यापुर्वीही सिने. मकरंद अनासपुरे यांची भुमीकाही असनारी नाटकेही या रंगभूमीने झाडीपटटीत नाट्यरसीकांच्या मनोरंजनाकरीता दिली. व आपल्या रंगभूमीचा झाडीपटटीत नावलौकिक केला.आणी यावर्षी सुध्दा रंगकर्मीं रंगभूमी ने येणा-या सिजन करीता सं.बापलेक, जनावर, असी माझी सासु,दुभंगले नाते रक्ताचे. व ईतर नवनविन नाट्यप्रयोगासह आपली कलावंतांची टीम सज्ज केली.यामध्ये यावर्षी दिग्दर्शक अनिल नाकतोडे, स्वर. डाॅ चेतन राणे, विनोदवल्ली संदिप गंधारे, विनोदमुर्ती विलास पेंटर,टु ईन वन गायक अनिल मीसार, आशिष ऊईके, धनराज मडावी, मिस. हेमा कापगते, सौ.वर्षा गुरनुले, करीष्मा मेश्राम व अभिनय सम्राज्ञी नुत्यांगना रजनी नागपुरकर.संगीत साथ रवि पुस्तोडे. आशीष गुरनुले.सोमेश्वर बुराडे.सुत्रधार जगदिश मांडवे.ध्वनी व प्रकाश योजना लक्ष्मी डेकोरेशन राजनी. नेपथ्थ ज्योती आर्ट..यांचा समावेश आहे.
या रंगभूमी चे कार्यालय लहरी काॅम्प्लेक्स लाखांदुर रोड वडसा येथे असुन नाट्यप्रयोगाची बुकींग सुरू आहे तरी नाट्यमंडळांनी आपली तारीख बुकींग करावी असे आवाहन निर्माता नितु पाटिल बुद्धे रंगकर्मीं रंगभूमी वडसा यांनी केले आहे. ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments