रत्नापुर-नवरगाव येथे नव्यानेच सुरू झालेल्या राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेचे उदघाटन आज दिनांक 30 जून 2023 ला संपन्न झाले, आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते सदर उदघाटन संपन्न झाले, समारंभाच्या अध्यक्ष स्थानी चंद्रपूर जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते होते, जेष्ठ नेते माजी सरपंच गोपाल चिलबुले, भाजप सिंदेवाही तालुका अध्यक्ष राजेंद्र बोरकर, संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, उपाध्यक्ष सौ अर्चना कामडी यांची उपस्थिती होती, आमदार भांगडीया व सर्व उपस्थित मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या, सहकार अधिकारी भारत भालके यांनी सहकार प्रशिक्षण दिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर बततुलवार व सौ राधा लोधे यांनी केले तर आभार हर्षा बोरकर यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रणव गायकवाड, जितेंद्र बोरकर, ओमप्रकाश फडणीस, मनीष घुगुरकार, मोरेश्वर बततुलवार, अरुण मुद्रिवार,सौ नीता वलेवार व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले