रत्नापूर दि 10 सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे पंधरा सदस्यीय ग्रामपंचायत कार्यरत आहे यात कविता सावसाकडे ह्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या सदस्यांना विश्वसात घेत नाही मनमानी कारभार करतात म्हणून या पंधरा सदस्य असलेल्या ग्राम पंचायत मधील तेरा सदस्यानी तहसिलदार सिंदेवाही यांचेकडे विद्यमान सरपंच विरुध्द अविश्वास प्रस्ताव सादर केला तहसिलदार यांनी दि 3 / 7 / 23 ला सर्व सदस्यांना दि 10 / 7 / 23 ला दुपारी दोन वाजता सभा ठेवण्याचा नोटीस दिला त्यानुसार आज मुंबई ग्राम पंचायत अधीनियम कलम 3 5 अन्वये सर्व कायदेशीर प्रकीया पार पाडण्यात आली आणी संरपच विरुद्ध अविश्वास ठराव पारीत करण्यात आला
यावेळी ग्राम पंचायत सभागृहात पार पडलेल्या ह्या अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच अशोक गभणे सदस्य वासूदेव दडमल वामन झोडे अरुन मडावी इमरान पठान प्रविण कुमार कामडी माया लोधे सुरेखा पर्वते उषा धारणे रजनी काऊलकर हेमलता सोनटक्के सुनंदा मांदाळे नजरी मेश्राम यांनी मतदान केले तर विरूद्ध बाजूने ज्यांचेवर अविश्वास ठराव होता त्या विद्यमान सरपंच कविता सावसाकडे यांनी मतदान केले सर्व सदस्यांनी हात वर करून मतदान करणे या प्रकिये नुसार घेण्यात आले तर ग्राम पंचायत सदस्य मंगेश मेश्राम हे अनुपस्थित होते यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून तहसिलदार सिंदेवाही योगेश शिंदे लिपीक युवराज मेश्राम ग्राम विकस अधिकारी नरेंद्र वाघमारे तलाठी आखरे आदी उपस्थित होते रत्नापुरात ही सरपंच याचेवर अविश्वास यायची पहीली वेळ असून ह्या मुळे सरपंच कविता सावसाकडे या सरपंच पदावरून पायउतार झाल्या आहेत जेव्हा निवडणुक झाली तेव्हा भाजपा प्रणीत आघाडीचे नऊ सदस्य तर कांग्रेस प्रणीत आघाडीचे सहा सदस्य निवडुन आले होते आणी विद्यमान सरपंच हया भाजपा प्रणीत होत्या परंतु भाजपा प्रणीत आघाडी आठ व कॉग्रेस प्राणी तर आघाडीचे पाच सदस्य असे तेरा सदस्य मिळून हा विदयमान सरपंच विरुद्ध अविश्वास ठराव पारीत करण्यात आला यावेळी कोणतीही गावात अनुचीत घटना घडु नये म्हणून पी एस आय सागर म हले यांचे सोबत पोलिस r कर्मचारी उपस्थीत होते कोणतीही घटना न घडता सर्व प्रकीया शांततेत पार पडली आता समोर रत्नापूर गावाला नविन सरपंच कधी मिळणार याकडे ग्राम वासीय जनतेचे लक्ष लागले आहे