कोरोना काळापासून देशात आरोग्य विषयी प्रचंड जनजागृती झाली असून केंद्र सरकारने जनतेच्या संपूर्ण उपचाराची माहिती एकत्रित राहावी त्याचप्रमाणे जनतेला पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यासाठी ABHA कार्ड व गोल्डन कार्ड काढलेले आहेत, यात गरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे , केंद्र सरकारच्या या योजनांची माहिती वाव्ही तसेच तळागाळातील जनतेला याचा लाभ घेता यावा याकरिता मुल येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे ओबीसी नेते राकेश ठाकरे यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, 17 व 18 नोव्हेंबर आयोजित या शिबिरात 380 ABHA कार्ड व 80 गोल्डन कार्ड जनतेला वाटप करण्यात आले, सदर कार्ड्स चे वाटप मुल भाजप चे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नप चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, आयोजक राकेश ठाकरे , चेतन कवाडकर यांचे हस्ते करण्यात आले, शिबिराच्या यशस्वीतेसाठी रवींद्र बर्डे, रामू गुरनुले,अनिकेत बुगगावार, ज्योस्तना गोहणे, सचिन वाकडे यांनी विशेष परिश्रम घेतले, केंद्र सरकारच्या या लाभदायी योजनांचा या शिबिराच्या निमित्ताने प्रचार प्रसार झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
राकेश ठाकरे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार च्या ABHA कार्ड व गोल्डन कार्ड साठी शिबीर
RELATED ARTICLES